Friday, May 30, 2008

जीमेलच्या ट्रिक्स आणि टिप्स: भाग - १

जीमेलामध्ये मेल स्टोरेज कॅपॅसिटी जीबी-जीबीने वाढू लागल्याने एक तोटा मात्र झाला - जुने मेल शोधणार कसे?

एक सोप्पा उपाय म्हणजे, जीमेलची 'Search Options' वापरणे.




(click to enlarge)

पण उगाच क्लिक-क्लिक करण्यापेक्षा सर्च कमांड्स टाईप करणे सोपे असते. एकदा तुम्हाला जीमेलचे लॉजीक कळाले की कमांड्स वापरणे कळाले की कमांड्स वापरणे आणखीनच सोप्पे होते.

१. "in:****"

जिमेलमध्ये तुमची पत्रे Inbox / All / Trash / Starred / Sent Mail / Drafts / Spam यापैकी कुठेतरी असतात. यातली सगळ्यात मोठी पत्रपेटी म्हणजे 'All'. बाकी सर्व पत्रपेट्या या 'All' चा एक भाग असतात. म्हणजे, पत्र Inbox मध्ये असले तरी ते All मध्येही असते आणि पत्र तुम्ही Spam म्हणून मार्क केले तरी ते All मध्ये असते.
एकदा ही गोष्ट लक्षात आली म्हणजे तुम्हाला वरील सर्च कमांड लक्षात राहतील. तुमचे पत्र कुठे सर्च करायचे आहे? समजा अजय नावाच्या एका मित्राने मला त्याच्या लग्नाचे आमंत्रण पाठवले होते आणि मला आता नेमकी वेळ आणि तारीख आठवत नाही. मला असे वाटते की हे पत्र अजुन inbox मध्येच आहे. मग मी वरील सर्च कमांड वापरेन. "in:inbox ajay invitition". म्हणजे, "in:****" यात **** च्या जागी तुम्ही पेटीचे नाव टाका, आणखी काही सर्च टर्म्स टाका...बस्स.

२. तुम्हाला जर अमुक एक व्यक्तिकडून आलेले मेल बघायचे असतील तर "from:****" ही सर्च कमांड वापरा. **** च्या जागी त्या व्यक्तिचे नाव किंवा त्याचा ईमेल अॅड्रेस टाईप करा.

तसेच तुम्ही पाठवलेल्या मेलमध्ये एखादा मेल सर्च करण्यासाठी "in:sent" किंवा "to:****" (**** च्या जागी ईमेल अॅड्रेस) या कमांड्स वापरा.

३."is:****"
जर तुम्हाला फ़क्त न वाचलेले मेल बघायचे असतील तर "is:unread" अशी सर्च कमांड टाईप करा.
जर फ़क्त स्टार केलेले मेल बघायचे असतील तर "is:starred" अशी सर्च कमांड टाईप करा.

४. "label:****"
विशिष्ट लेबल मध्ये मेल सर्च करण्यासाठी या सर्च कमांडचा उपयोग होईल. उदा. "label:Office"

5. अॅटॅचमेंट सर्च करण्यासाठी -"has:attachment".
तुम्हाला जर अॅटॅचमेंट नेमकी कुठल्या प्रकारची होती हे आठवत असेल, तर "filename:****" अशी कमांड टाईप करा. इथे, **** च्या जागी, doc (for word documents) / xls (for excel sheets) / pdf / ppt किंवा pps (powerpoint presentations / shows) इ. फाईल टाईप असू शकतात.

याशिवाय आणखी काही सर्च कमांड्स आहेत पण वरील सर्व एकदम कामचलाऊ.
आता तुम्ही वरील कमांड्सची combinations सुद्धा वापरू शकता. उदाहरणार्थ -
is:unread in:trash
from:prakash filename:zip
has:attachment is:unread is:starred
label:friends from:priyaa
इ. इ.

Wednesday, May 21, 2008

ब्लॅकबेरी म्हणजे काय रे भाऊ?

 

http://www.navigadget.com/wp-content/postimages/2007/02/blackberry-rim-8800-943.jpg

मी: आपण सगळे पामर बहुधा साधे फोन वापरणारे. फार तर आपली झेप N73 पर्यंत. मग हा ब्लॅकबेरी म्हणजे कोण? तो कशाशी खातात?

भाऊ (किंचित हसून): सांगतो. आधी सार सांगतो, मग कथा. ई-मेल तुझ्या मोबाईलवर 'ढकलणे' याची सुरुवात केली या ब्लॅकबेरीने. हे आहे एका विशिष्ट तन्त्रज्ञानाचे नाव.
आता कथा ऐक. पान्ढरपेशा माणूस कामा-व्यवसायासाठी जसा जास्त फिरू लागला, तशी त्याची ई-मेल ची भूक वाढली. मग ई-मेल मोबाईल फोन वर आला तर किती बरे! पण तो येणार कसा? २ पर्याय. १. GPRS चालू करून, आपल्या मेल-साईट वर जाउन तासा-तासाने मेल तपासणे; २. 'असे काहीतरी' हवे की ज्यायोगे मेल माझ्यापर्यंत यावा.
भावड्या, नं. २ चे हे 'असे काहीतरी' म्हणजेच ब्लॅकबेरी.

१९९७ मध्ये ब्लॅकबेरी जेव्हा प्रथम आला, तेव्हापासून या 'मेल ढकलणे' मध्ये वाकबगार असणारा तो एकमेव प्राणी होता. आता बरेच जण हे सत्कृत्य करतात. तरीही, यात अजूनही नं. १ सेवा ब्लॅकबेरीच देते.

ब्लॅकबेरीच्या मागे आहे Research In Motion उर्फ RIM ही कंपनी. हे तन्त्रज्ञान आणि त्यासाठी लागणारे ख़ास हॅंड-सेट ही कंपनी बनवते. RIM मग विविध मोबाईल सेवा कंपन्यांशी करार करते. त्यामुळे मग Airtel आणि  Vodafone यासारख्या  कंपन्या भारतात ब्लॅकबेरी सेवा देतात.

मेल ढकलणे (Push e-mail)

ब्लॅकबेरी

RIM

ब्लॅकबेरीच का?